अभ्यासक आणि नागरिक
अत्युच्च पातळीचे विचार, कल्पनाशक्ती आणि सहृदयता हे गुण असणे आणि ते वापरले जाणे, हे साऱ्या व्यासंगात अनुस्यूत असते. त्यानेच व्यासंगाची सर्वाधिक उपयुक्तता घडत असते. (म्हणून) अभ्यासकाच्या कृतींमध्ये व्यासंग असा प्रतिबिंबित व्हायला हवा की त्यातून अभ्यासक माणसांपासून दूर न जाता माणसांकडे ओढला जात आहे, हे सिद्ध व्हावे. व्यासंगातून माणसांची आणि पर्यायाने अभ्यासकाचीही साध्ये गाठली जायला हवीत. …